जामखेड तालुक्यात परत कोरोनाचा कहर! …या गावात आठ दिवसांत सहा बळी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- मागील वर्षी जामखेड तालुक्यात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे आता काळजी घेणे आवश्यक होते.

मात्र काळजी न घेतल्याने तालुक्यातील दिघोळ येथे आठ दिवसांत कोरोनाचे तब्बल ६ जणांचा बळी गेला आहे. याबाबत माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील दिघोळ येथे आठ दिवसात कोरोनाचे सहा बळी गेल्याने खर्डा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

आतापर्यंत या गावात कोरोनाचे तब्बल ९८ रुग्ण आढळून आल्याने प्रशासन चक्रावून गेले आहे. आतापर्यंत ज्या सहा जणांचा बळी गेला त्यांना वेगवेगळ्या ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.

या सर्वांचे अंत्यसंस्कार हे तेथील प्रशासनाने केले आहेत. कोणाचाही अंत्यविधी दिघोळ गावात झाला नाही. गावात कोरोनाच्या टेस्ट वाढविल्या आहेत अनेक लोक भीतीने कोरोना टेस्टसाठी पुढे येत नसल्याने आरोग्य विभागा पुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने सध्या दिघोळ गाव लॉकडाऊन करण्यात आले असून, आरोग्य विभागाने दिघोळ येथील ग्रामस्थांनी टेस्ट करून घेण्याचे आवाहन जामखेडचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील बोराडे यांनी केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe