राज्यात कोरोनाचा कहर ; 24 तासात आढळले एवढे रुग्ण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा कोरोना फोफावू लागला आहे. दरदिवशी आकडेवारीमध्ये वाढ होऊ लागली आहे.

यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. यातच अनेक जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे.

दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असून गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल २५ हजार ८३३ नव्या रुग्णांची भर पडली आहे.

तर ५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १२ हजार ७६४ रुग्ण कोरोनामुक्त देखील झाले आहेत.

राज्यातील आकडेवारी २५ हजारांच्या पार पोहोचली असताना मुंबईत कोरोनाची भयावह परिस्थिती पाहायला मिळत आहे. एकट्या मुंबईत गेल्या २४ तासांत २ हजार ८७७ नव्या रुग्णांची भर पडली आहे.

तर ८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईची आकडेवारी आता चिंता वाढवणारी ठरत आहे. त्यामुळे मुंबई आता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचे हे संकेत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe