अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-भारतात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे.
ब्रिटनने भारताला रेड लिस्टमध्ये टाकलं आहे. आता त्याला एअर इंडियाने चोख प्रत्युत्तर दिले असून ब्रिटनकडे जाणारी सर्व उड्डाणे 24 ते 30 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहेत.
ही माहिती एअर इंडियाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान ब्रिटन बरोबरच अमिरातने गुरुवारी घोषणा केली की, दुबई ते भारत दरम्यानची सर्व उड्डाणे 10 दिवस बंद राहणार आहेत.
25 एप्रिलपासून पुढील दहा दिवस भारत आणि दुबई दरम्यान त्यांची उड्डाणे चालणार नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे.
फ्रान्सने देखील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारतातून येणाऱ्या पर्यटकांवर प्रवेशबंदी लागू करणार आहे.
बुधवारी एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. यापूर्वी ब्राझील, अर्जेंटिना आणि चिली येथून येणाऱ्या पर्यटकांनाही बंदी घातली गेली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|