अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- राज्यभरात एमपीएससीची परीक्षा रविवार रोजी पार पडली. कोरोनाच्या सावटात या परीक्षा होणार झाल्याने या अनुषंगाने जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर मोठ्या उपाययोजना करण्यात आल्या.
मात्र तरीही या परीक्षेकडे तब्बल सहा हजार विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली. दोन सत्रात घेण्यात आलेल्या परिक्षेला जवळपास साडेनऊ हजार विद्यार्थी हजर होते.
एमपीएससीची परीक्षा नगर शहरातील तब्बल ५१ केंद्रावर दोन सत्रात परिक्षा पार पडली. सकाळच्या सत्रात १५ हजार ८४८ परिक्षार्थीं पैकी ९ हजार ५०५ परिक्षार्थींनी परिक्षा दिली तर ६ हजार ३४३ गैरहजर राहिले.
दुपारच्या सत्रात ९ हजार ४८३ विद्यार्थी हजर होते तर ६ हजार३६५ विद्यार्थी गैरहजर होते. राज्य सेवा (पूर्व) परीक्षा एकूण ५१ उपकेंद्रांवर घेण्यात आली.
सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत परिक्षा पार पडली.परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी १ हजार ६३८ अधिकारी – कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|