संगमनेर तालुक्यात कोरोनाचे थैमान, रुग्णांसह नातेवाईकांची हेळसांड’ !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात थैमान घातलेले असताना प्रशासकीय व कोणतीच व्यवस्था रुग्णांच्या मदतीला पुढे येत नसल्याने रुग्ण व नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या ढिसाळ प्रशासकीय यंत्रणेवर शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी यांनी नाराजी व्यक्त केली. कोरोनामुळे राज्यभरात पुन्हा एकदा टाळेबंदी आहे.

रेमडेसिविरची अवाजवी किमतीने विक्री होत आहे. इंजेक्शन वाटप नियंत्रणाचे अधिकार अन्न व औषध विभाग आणि सहायक आयुक्त यांच्याकडे असल्याने इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे शंका उपस्थित होत आहे.

इंजेक्शन अभावी अनेक रुग्ण दगावत आहेत. यामुळे शहरात दोन दिवसात तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याची जबाबदारी कोण घेणार? रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नाही. व्हेंटिलेटरची सुविधा नाही.

अत्यवस्थ रुग्णांना उपचार उपलब्ध होत नाहीत. यामुळे आरोग्य व्यवस्था कुचकामी ठरत आहे. कुचकामी अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवला जात आहे.

मग सर्वसामान्य मदत मागणार कोणाकडे? असा सवाल कतारी यांनी केेला. प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा कतारी यांनी दिला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe