नगरसेविका पल्लवी जाधव यांचा कोरोनायोद्धा सन्मानाने गौरव

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  शहरातील प्रभाग क्रमांक 6 च्या नगरसेविका पल्लवी जाधव यांना आय लव्ह नगर परिवारातर्फे कोरोना योद्धा सन्मानाने गौरवण्यात आले. जाधव यांनी कोरोना काळात सर्व प्रकारे जनतेची सेवा करुन गरजूंना अन्न-धान्य, रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे अर्सेनिक गोळ्या, मास्क व सॅनीटाइजरचे वाटप केले.

रक्ताचा तुडवडा भासत असताना भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करून नागरिकांना रक्त उपलब्ध करून दिले. या कार्याची दखल घेत त्यांना आय लव्ह नगर परिवाराने कोरोना योद्धा सन्मानाने गौरविले.

तसेच कोरोना संकटकाळात त्यांनी नागरिकांना धीर देण्याचे कार्य केले. घरातल्या सदस्याप्रमाणे रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यापासून रुग्णांची विचारपूस व प्रत्येकाला हवी ती मदत पुरवली.

कोरोना काळात माणूस माणसाजवळ जाण्यास घाबरत असताना त्यांनी नागरिकांच्या घरोघरी जावून आस्थेने सर्वांची विचारपूस केली. यासर्व कार्याचा कोणताही गाजावाजा न करता गरजूंना मोलाची मदत करुन त्यांना आधार दिला. जाधव या पर्यावरणप्रेमी असून त्यांनी प्रभागात विविध ठिकाणी वृक्षरोपण मोठया प्रमाणात केले.

त्यांची वृक्षांप्रती असणारी आवड पाहून पक्षाने त्यांची महापालिकेच्या वृक्षसंवर्धन समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. पल्लवीताई प्रभागात मोबाईल नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात.

रात्री-अपरात्री नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्या सदैव तत्पर असतात. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe