अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :-कर्जत तालुक्यातील गुरवपिंप्री येथील तलाठी चंद्रकांत गजाबा बनसोडे हा लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
शेतीचे वाटणीपत्र करुन त्याआधारे फेरफार नोंद करण्यासाठी त्याने २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मिरजगाव येथे त्याला जेरबंद करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर असे की, तक्रारदार यांनी त्यांचे चुलत भावाचे गुरवपिंप्री गावातील शेतीचे वाटणी पत्र करुन त्याआधारे फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी सजा गुरवपिंप्री यांच्याकडे अर्ज दिला होता.
त्याआधारे फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी व त्याचा मदतनीस (खाजगी इसम) यांनी तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपयांची मागणी केली.
मात्र तक्रारदार यांनी लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाच्या पथकाने प्राथमिक आरोग्य केंद्र, नगर सोलापूर हायवे, मिरजगाव येथे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक केली.
अमित सर्जेराव शिर्के हा पथकाच्या हाती लागला नाही. कर्जत तालुक्यातील महसूल विभागात लाच स्वीकारताना तलाठी सापडल्याने खळबळ उडाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम