मानसिक ताणतणावातून जात असलेल्या व्यक्तींसाठी टोल फ्री क्रमांकावर मिळणार समुपदेशन !

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- कोरोना महामारीत वाढलेल्या संसर्गामुळे बाधित व्यक्तींचे व त्यामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे वाढलेले प्रमाण विचारात घेता अशा व्यक्तींच्या नातेवाईक व बालके मानसिक व भावनिक रीतीने खचून निराशेत, चिंतेत अथवा एकटेपणात जाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.

त्या अनुषंगाने अशा मानसिक ताणतणावातून जात असलेल्या व्यक्तींच्या शंकाचे निरसन करण्यासाठी महिला व बाल विकास विभाग व मुंबई प्रोजेक्ट यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.

मुंबई प्रोजेक्ट यांच्या माध्यमातून १८००१०२४०४० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या क्रमांकावर फोन केल्यास समपदेशनाची गरज असलेल्या व्यक्तीस तज्ञ

समुपदेशकांकडून ऑनलाईन सल्ला व मार्गदर्शन सुविधा दररोज सकाळी ८ ते संध्याकाळी ८ यावेळेत उपलब्ध करण्यात येईल. प्रसिध्दीसाठी लागणारे पोस्टर्स सोबत देण्यात येतील.

असे सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण तथा आयुक्त, महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी कळवले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe