अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- राहुरी येथे तहसीलदार म्हणून पदभार स्विकारल्यापासून आपल्या कामाची स्टाईल आणि कर्तव्यदक्षता यामुळे नेहमी जनतेच्या मनात व समाज माध्यमात चर्चेत असलेले राहुरीचे तहसीलदार फसीयोद्दीन शेख यांनी कोरोना काळातही आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे.
त्याचाच भाग म्हणून राहुरी पोलिसांच्या कोठडीत असलेल्या आरोपींना कोरोना लसीकरण केले जाण्याची संकल्पना तहसीलदार शेख व्यक्त करत तालुका आरोग्य अधिकारी यांना पत्रव्यवहार करून लवकरात लवकर आरोपींना कोरोना लसीचे डोस उपलब्ध करून देण्याचे कळविले आहे.
नगर जिल्ह्यात नव्हेंबतर संपूर्ण महाराष्ट्रात आरोपींना जेल मध्ये लस मिळण्याची बहुदा ही पहिलीच घटना असावी.अनेक वेळेस आरोपींना न्यायालयात ,घटना स्थळी,ने -आण करावी लागते,
काही वेळेस नवीन आरोपी कोठडीत येत असतात आणि यामध्ये वेगवेगळ्या नागरीकांच्या संपर्कात आरोपी येत असल्याने कोरोना बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भावकीच्या वादातून, हुंडाबळी, किरकोळ चोऱ्या,शेतकऱ्यांच्या बांधावरून भांडणे,पती पत्नी वाद यासारख्या प्रकारातून न्यायालयीन कोठडीत राहुरी जेलमध्ये असलेले आरोपींना इतर नागरीकांसारखे नंबर लावून कुठे लस मिळणार नसल्याने महसूल प्रशासनाने त्यांना जेल मध्येच लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
यामुळे पोलीस कोठडीत असलेले स्त्री आणि पुरुष यांना लस मिळणार आहे.आरोपी म्हणून जेल मध्ये असलेले शेतकरी,नागरीक, व्यापारी, हे परिस्थितीमुळे गुन्हेगार झालेले आहेत . त्यांना लसीकरण केल्यामुळे आरोपींच्या सुरक्षेत भर पडून कोरोना संसर्ग टाळता येईल.
राहुरीचे उपविभागीय अधिकारी डॉ. दयानंद जगताप यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार फसीयोद्दीन शेख यांचे संकल्पनेतून पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ,तालुका आरोग्य अधिकारी दीपाली गायकवाड यांचे सहकार्याने लवकरच लसीकरण शिबिर आयोजित केले जाणार असल्याचे समजते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम