क्रिकेटमुळे टीमवर्क व खिलाडूवृत्ती जोपासली गेली त्यामुळे आयुष्यात यश प्राप्त झाले – पद्मश्री पोपट पवार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- पूर्वीच्या काळी खेळा बाबत मुले जागृत होती तर सध्याच्या काळात पालक जागृत झाले असून मुलांना सर्व सुविधा उपलब्ध होत आहेत.या संधीचा मुलांनी फायदा घेतला पाहिजे.क्रिकेटची आवड होतीच , क्रिकेटमुळे टीमवर्क व खिलाडूवृत्ती जोपासली गेली त्यामुळे आयुष्यात यश प्राप्त झाले असे मत मा. पद्मश्री पोपट पवार यांनी व्यक्त केले.

अहमदनगर जिल्हा क्रिकेट असो.च्या मान्यतेने आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांचा शुभारंभ जिल्हा आदर्शगावचे मा. पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी जिल्हा क्रिकेट असो.चे उपाध्यक्ष श्री.सुमतिलाल कोठारी,सचिव गणेश गोंडाळ,सी.जी. कंपनीचे गौतम सुवर्णपाठ्की ,अविनाश पाटील,राजेंद्र चव्हाण,गौरव पितळे,अभिषेक झावरे, जगन्नाथ ठोकळ, पी.डी.कुलकर्णी,महेंद्र कुलकर्णी,राजेंद्र निबांळकर,व मान्यवर उपस्थित होते.

आदर्शगावचे सरपंच मा. पोपट पवार म्हणाले की, क्राँम्पटन व बाळासाहेब पवार यांचे क्रिकेट साठीचे योगदान अतुलनीय असून क्रिकेट वृद्धीसाठी बाळासाहेब स्मृती करंडक शालेय क्रिकेट स्पर्धा सातत्याने सुरु राहीलअसा विश्वास व्यक्त केला. सध्या कोव्हिडच्या परिस्थितीत या स्पर्धेमुळे मुलांना दिलासा मिळेल व सर्व नियम पाळून हि स्पर्धा यशस्वी होईल असेही पोपट पवार म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कपिल पवार यांनी केले. सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते स्व. बाळासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणात आला. मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून १६ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

पहिला सामना एस.के.क्रिकेट अकँडमी व सहकार क्रिकेट क्लब यांच्यात झाला.यावेळी कंपनीचे अधिकारी , कर्मचारी क्रिकेट प्रेमी, शंतनू भावे,शरद नरसाळे, डॉ.अमित सपकाळ,डॉ.विठ्ठल पळसकर व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.आभार अरुण नाणेकर यांनी मानले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe