अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-प्रवासासाठी नागरिकांना कोरोना निगेटिव्ह असल्याचा बोगस रिपोर्ट देणाऱ्या टोळीवर हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली आहे.
हा प्रकार सोमवारी (दि. १९) दुपारी वाकडमधील इंदिरा कॉलेज जवळ उघडकीस आला असून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्ताराम केसारामजी देवासी (वय ३३ रा. भुमकर वस्ती, वाकड), राकेशकुमार बस्तीराम वैष्णव (वय २५ रा. धनकवडी, पुणे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, चिरंजीव (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही), राजू भाटी (रा. वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्या
इतर आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल कुणाल शिंदे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील इंदिरा कॉलेज जवळ असणाऱ्या शनी मंदिरात कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र प्रवास करणाऱ्या नागरिकांना एक टोळी पुरवत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत चार जणांवर कारवाई केली. त्यातील आरोपी राकेशकुमार वैष्णव हा बनावट कोरोना रिपोर्ट बनवून व्हॉट्स ॲपवर पाठवत होता. हे रिपोर्ट वाकड येथून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांच्या मागणीनुसार दिले जात होते.
रिपोर्टवर लाइफनीटी वेलनेस इंटरनॅशनल लिमिटेड बावधान या लॅबचे बनावट लेटरहेड आणि डॉक्टरांचे बनावट सह्या व शिक्के असल्याचे दिसून आले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|