अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी राहुरी फॅक्टरी येथील तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा परसराम गायकवाड (रा. राहुरी फॅक्टरी) हिने याबाबतची फिर्याद दिली आहे.
परसराम संजय गायकवाड, संजय उत्तम गायकवाड, रेणुका संजय गायकवाड (रा. राहुरी कारखाना, ता. राहुरी) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.
ऑगस्ट २०२० पासून ते २८ डिसेंबर २०२० पर्यंत सासरी, राहुरी कारखाना व पुणे येथे हा छळ झाला. पूजा गायकवाड हिस व्यवस्थित स्वयंपाक येत नाही.
तू लवकर उठत नाही. तुझे आई-वडील किराणा दुकान टाकण्यासाठी दीड लाख रुपये देत नाहीत, या कारणावरून पूजा हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करून उपाशीपोटी ठेवून घराच्या बाहेर हाकलून दिले.
तसेच तुझ्या आई-वडिलांकडून किराणा दुकान टाकण्यासाठी दीड लाख रुपये आणले नाही, तर तुला जिवंत सोडणार नाही, असा दम दिला आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम