लग्नास नकार देणाऱ्या वराविरुद्ध विनयभंग व फसवणुकीचा गुन्हा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- शासकीय नोकरीस असलेल्या एका ४७ वर्षीय घटस्फोटित विवाहितेची एका मॅट्रोमेनी अॅपवर नाशिक येथील एका शिक्षकाबरोबर ओळख झाली.

त्याच्या मध्यस्तीने नाशिक येथील रहिवासी सुधाकर हिरामण पगारे यांच्याबरोबर ओळख झाली. दरम्यान ओळख वाढल्यावर दोघांनी शिक्षकाच्या मध्यस्थीने आपसांत लग्न करण्याचे ठरवले. २२ जून रोजी त्यांनी लग्न करण्याचे ठरवले.

पण यातील नियोजित नवरदेव सुधाकर हिरामण पगारे यांचा १८ रोजी खरा चेहरा समोर आला. त्यामुळे संबंधित घटस्फोटित महिलेने आरोपी सुधाकर हिरामण पगारे याच्याविरोधात पोलिसांत विनयभंग व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

अकोले शहरातील घटस्फोटीत शासकीय नोकरी करणाऱ्या एका महिलेची ऑनलाईन मॅट्रोमेनी अँप वर नाशिक येथील सुधाकर हिरामण पगारे याचेशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर पुढे लग्न करण्यापर्यंत गेले.

त्यांनी आपसांत सल्लामसलत करून २२ जून रोजी लग्नाची तारीखही निश्चित केली. असे असतानाच नियोजित वर दरम्यान अकोल्यात या महिलेच्या घरीच स्वतःच हजर झाला.

तो १८ जून रोजी यातील महिलेच्या घरी आल्यावर या महिलेस त्याचा विचित्र अनुभव आला. त्याने लग्नापूर्वी या महिलेस घरातील बेडरूममध्ये ओढून विनयभंग केला. त्याने या महिलेस लग्न करण्यास नकार देऊन फसवणूकही केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News