अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोना संकटाचे ढग दाटून आले असताना सर्वजण जगण्यासाठी जीवांच्या आकांताने धडपड करतो आहे.
यातच नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी प्रशासन देखील युद्धपातळीवर काम करत आहे. मात्र दुसरीकडे नागरिकांना अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याने आता नागरिकांचे आरोग्यच धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
कोपरगाव शहराला आठ दिवसांतून एकदाच पाणी पुरवठा करणाऱ्या नगर परिषदेने मंगळवारी मोहिनीराज नगर परिसरात नळाद्वारे अक्षरश: गटारमिश्रित पाण्याचा पुरवठा केला आहे.
त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन नागरिकांनी नगर परिषदेविषयी संताप व्यक्त केला आहे. सुमारे १ लाखाच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या कोरपरगाव शहरात घरांची संख्या ही २२ हजार इतकी आहे.
या सर्व नागरिकांना नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपरिषदेच्या जलवाहिन्यांना सततची गळती लागलेली असते. काही जलवाहिन्या तर गटारीमध्येच फुटलेल्या असतात.
त्यामुळे गटारीचे पाणी हे या जलवाहिन्यांमध्ये आठ दिवस साचले जाते. ज्या दिवशी पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे वारंवार तक्रार करूनही नगर परिषद दखल घेत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे.
कोरोनाच्या या संकटात नागरिकांचे आरोग्य सुरक्शित राहावे यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरु असताना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांवर हि संकट ओढवले असल्याचे दिसून येत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|