केजरीवालांची केंद्रावर सडकून टीका, तर नरेंद्र मोदींकडून ‘आप’ चे अभिनंदन आणि दिले ‘हे’ आश्वासन

Content Team
Published:

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) पक्षाला हरवून आप ने पंजाब (Punjab) मध्ये डंका मारला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पदरी निराशा आली आहे. ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकाल लागला असून ४ राज्यात भाजपची (BJP) सत्ता येणार हे आता स्पष्ट झाले आहे.

विजयाचे सेलिब्रेशन करण्यासाठी भाजपने पक्षाच्या मुख्यालयात जंगी कार्यक्रम ठेवला होता. यावेळी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आप (AAP) चे कौतूक करत अभिनंदन देखील केले आहे.

काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत वादामुळे पंजाब राज्य त्यांच्या हातातून निसटले असल्याचे सांगितले जात आहे. याचा फायदा आप ला झाल्याचे दिसत आहे. आप च्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करत आनंद व्यक केला आहे.

नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आप पक्षाला शुभेच्छा दिल्या आहेत तर पंजाबच्या कल्याणासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले आहे.

आप पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनीही विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, कॅप्टनसाहेब हरले, चन्नीही हरले, नवज्योतसिंह सिद्धू हरले. हा मोठा विजय आहे.

भगतसिंग म्हणाले होते की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण व्यवस्था बदलली नाही तर काही बदललं नाही. पंजाबच्या जनतेनं यावेळी व्यवस्था बदलली आहे. तर आपने देशात व्यवस्था बदलली आहे.

तसेच केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर ही जोरदार टीका केली आहे. आज नव्या भारताचा संकल्प करू. नवा भारत ज्यात द्वेष नसेल, माता-भगिनी सुरक्षित असतील, प्रत्येकाला शिक्षण असेल.

आपण असा भारत बनवू, ज्यात अनेक मेडिकल कॉलेज असतील, ज्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना यूक्रेनमध्ये जावं लागणार नाही. असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe