अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कधी तरी संधी येते. त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रामाणिक, इमाने ऐतबारे प्रयत्न केला.
जलयुक्त शिवाराच्या माध्यमांतून असेल किंवा इतर अनेक योजनांच्या माध्यमांतून असेल सगळ्यांच्या बांधापर्यंत, घरापर्यंत विकास पोहोचवण्याचे काम केलं. लोक म्हणतात काय केलं? अरे कांदा चाळी इतक्या दिल्या त्यात लोकं जाऊन राहायला लागली.

पण आता दोन वर्षात एखादी कांदा चाळ मिळाली का ? कांदा चाळीचा जेवढा विदर्भाला कोटा होता तितका कोटा मी एकट्या कर्जत – जामखेड मतदारसंघाला आणला होता असे सांगत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता थेट निशाणा साधला आहे.
माजी मंत्री राम शिंदे व खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत जामखेड तालुक्यातील हळगावमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी केली.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले कि, सगळ्यांची चेहरे बघतोय, सगळ्यांना कसं बरं वाटतयं, मोक्कारचं बरं वाटतयं, आता सांगता येईना अन बोलता येईना, निव्वळ अवघड जाग्यावरचं दुखणं झालंय, पण शेजारच्या गड्याला काम दाखवलं, कशी जिरवली म्हणता? माझी तर जिरली तर जिरली,
पण आता जेव्हा मी बाहेर आलो, तेव्हा सगळी माणसं म्हणतात आमची जिरली. मंत्री असताना पाच वर्षात बील नाही मागितलं, पाच वर्षात पदर भरून कुणाला डिपी लावावी लागली नाही. आता डिप्या पदर भरून आणाव्या लागतात. फोन करून बघा आमची डिपी उतरायला लागलेत
डिपी जळालीय मग समोरून उत्तर येईल बिलं भरून टाक अन मग फोन कर, वाह रं पठ्ठ्या हिच पाहिजं व्हतं असं लोक म्हणतात अशी खोचक टिका करत शिंदे यांनी रोहित पवारांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मी मंत्री असताना कुणीही म्हणायचं करू का साहेबाला फोन, लगेच अधिकारी म्हणायचा नको घेतो ना तुझं नाव यादीत.
नगरपर्यंत कलेक्टर ऑफीस ला जाऊन म्हणायचे करू का फोन पण आता तुम्हाला तलाठ्याच्या ऑफीसमध्ये कुणी इचारीना अशी परिस्थिती झालीय असे शिंदे म्हणाले. मी मंत्री असतानाच्या काळात डिपी जळाली अन डिपी महिनाभर मिळाली नाही असा एक दिवस होता का ? तिसऱ्या दिवसांत डिपी येऊन बसवायची, जळालेली घेऊन जायची.
पण आता डिपीचं तर सोडाचं आता लाईट दोन दिवसालाय आणि ती पण सतत नाही.असा सगळा प्रकार चाललाय. विम्याचा पैसा नाही, डिप्या अजुन उतरायला सुरू व्हायच्या, भरणं अजून सुरू झाले नाही. जसं भरणं येईल तश्या जर डिप्या नाही उतरिवल्या अन त्या टायमाला माझं नाही ध्यान झालं तर मग बोला असे म्हणतं जनतेला मागील पाच वर्षाच्या कारभाराची शिंदे यांनी आठवण करून दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम