विखे पाटलांची टीका, केंद्रावर आरोप करा आणि आपलं पाप झाका…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-  फक्त फेसबुकवर संवाद साधून तुम्ही जनतेचं समाधान करू शकणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी सध्या एकच मंत्र्यांना काम दिलंय. केंद्रावर आरोप करा आणि आपलं पाप झाका.

राज्यातील जनतेला आज वाऱ्यावर सोडल्याची भावना झाली आहे, अशी टीका भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. विखे पाटील म्हणाले, नगर जिल्ह्यात ४ मंत्री आहेत.

इथले पालकमंत्री पाहुण्यासारखे येतात. त्यांच्या स्वत:च्या तालुक्यात ते एकही कोविड रुग्णालय सुरू करू शकलेले नाहीत. सगळं खासगी रुग्णालयांच्या भरवशावर सोडलंय. जिल्ह्यातील ३ -३ मंत्री करतात काय?”

केंद्रावर बोट दाखवण्यापेक्षा रेमडेसिवीर, ऑक्सिजन उपलब्ध करा. प्रत्येक मंत्र्याला आपापल्या मतदारसंघात २०० बेडचं कोविड रुग्णालय उभारायला सांगा.

फक्त फेसबुकवर संवाद साधून तुम्ही जनतेचं समाधान करू शकणार नाही, असा टोला देखील विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर राज्याला व्हॅक्सिन मिळालं. पण त्याचं नियोजन राज्य सरकार करू शकलं नाही.

तो नियोजन शून्य कारभार झाकण्यासाठी किंवा लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. आपण केंद्राकडे बोट दाखवतोय. पण हजारो रुग्ण आज हॉस्पिटलमध्ये आहेत. हजारो रुग्णांना बेड मिळत नाहीयेत.

नगरमध्ये रेमडेसिवीर मिळत नाहीयेत, आरोग्य सेवा उपलब्ध नाहीत”, असं ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी करोना लसीच्या डोसचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.

त्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचं देखील चित्र दिसत असून राज्याला पुरेसे लसीचे डोस मिळावेत,

अशी मागणी राज्य सरकारकडून केली जात आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून पुरेसे लसीचे डोस दिले जात असल्याचा दावा केला जात आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe