मदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळ आणि जोरदार वार्यामुळे 20 गावातील 56 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे.
यात 67 शेतकर्यांना या वादळाचा फटका असून त्यात आंबा पिकाचे प्रमाण अधिक आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या पंचानाम्यावरून ही बाब समोर आली असून सर्वाधिक बाधित गावे ही पारनेर तालुक्यातील आहेत.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत तौक्ते चक्रीवादळ आणि जोरदार वार्यामुळे 20 गावांतील 56 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे.
कृषी विभागाने मंगळवारी केलेल्या पंचनाम्यामध्ये नगर तालुक्यातील 3 गावांत 2 हेक्टर 8 गुंठे क्षेत्रावर 4 शेतकर्यांचे आंबा पिकाचे,
पारनेर तालुक्यातील 14 गावांत 40 हेक्टर 2 गुंठे क्षेत्रावर 51 शेतकर्यांचे आंबा पिकाचे, कोपरगावातील 2 गावांत 9 शेतकर्यांचे 7 हेक्टरवर आणि श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात 5 हेक्टर 6 गुंठे क्षेत्रावर 3 शेतकर्यांचे आंबा पिकाचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे.
तसेच या चक्री वादळाचा महावितरणला जिल्ह्यात मोठा फटका बसला आहे. चक्री वादळामुळे जिल्ह्यातील 25 उपकेंद्रे, 344 वाहिन्यांचा, 9 हजार 341 रोहित्र आणि 552 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम