बापरे..! चाचणी न करताच कोरोनाचा अहवाल आला पॉझिटिव्ह!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- लाळेचा नमुना देताच एका जणाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा प्रकार घडला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील कोविड सेंटरमध्ये.

मोताळा येथील कोरोना सेंटरमध्ये काय सुरु आहे ,याचा यावरून अंदाज बांधता येऊ शकतो. मोताळा येथील कोविड सेंटरमध्ये 25 फेब्रुवारी रोजी मोताळ्याचे रहिवाशी पंडितराव देशमुख यांना अस्वस्थ वाटत असल्याने ते मोताळा येथील कोविड सेंटरमध्ये तपासणीसाठी गेले होते. तेथे त्यांनी केवळ नाव नोंदणी केली.

त्यानंतर संबंधित डॉक्टरांनी देशमुख यांना दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता तपासणीसाठी वेळ दिला. मात्र ते या ठिकाणी परत तपासणीसाठी गेले नाही. त्यानंतर शुक्रवारी कोविड सेंटरमधून त्यांना फोनद्वारे सांगण्यात आले की तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तुम्ही कोरोना सेंटरमध्ये यावे आणि उपचार घ्यावे.

कोरोनाचा स्वॅब न देताच रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पंडितराव यांना धक्का बसला. आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा? असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यांनी मोताळा येथील कोरोना सेंटरमध्ये जाऊन याबाबत विचारणा केली असता त्यांना उडवा उडवीचे उत्तरे मिळाली.

रुग्णाचा स्वॅब न देता या मोताळा येथील कोरोना सेंटरमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह येतात तरी कसे? याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र पूरी यांना विचारणा केली असता त्यांनी सॅम्पल कन्टेनरला चुकून दुसऱ्याचं नाव टाकलं गेले असल्याची चूक कबुल केली. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर चालणाऱ्या जिल्ह्यातील कोविड सेंटर कशी चालतात अशा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News