बापरे ! म्हणून संपूर्ण कुटुंबानेच केली आत्महत्या!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- नागपूरमध्ये एकाच कुटूंबातील पाच जणांची हत्त्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच एकाच कुटुंबातील सहा जणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

आत्महत्या केलेल्यामध्ये आई-वडील, तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. फळबागांचे पिक घेण्यास अपयश व डोक्यावर कर्जाचे ओझे वाढत असल्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

भीमराव सुरापुरा, त्यांची पत्नी शांतम्मा, मुलगा शिवराज आणि मुली सुमित्रा, श्रीदेवी, लक्ष्मी अशी त्यांची नावे आहेत. ही घटना कर्नाटकमधील यादगीरमध्ये सोमवारी घडली. याबाबत सविस्तर असे की, कर्नाटकमधील यादगीरमध्ये राहणारे भीमराव सुरापुरा यांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे वाढलं होते.

त्यात परत पिक घेण्यास अपयश आल्याने आता हे कर्ज कसे भरायचे असा प्रश्न त्यांना पडला होता. एकीकडे वाढत असलेले कर्ज व पिक घेण्यास आलेले अपयश त्यामुळे आथिर्क विवंचनेत सापडल्याने अखेर शेततळ्यात उडी घेऊन कुटुंबाने आपले जीवन कायमचेच संपवले.

आर्थिक अडचणीमुळे हतबल झालेल्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्यासारखे टोकाचं पाऊल उचलल्याच्या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तलावातून सहा जणांचे मृतदेह काढले. तसेच शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe