अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- अहमदनगर जिल्हा मराठा सेवा संघ व अहमदनगर जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने मराठा समाजात महत्त्वपूर्ण योगदान देणार्या व्यक्तींना देण्यात येणार्या ‘मराठा समाज भुषण पुरस्कारां’साठी यावर्षी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व माजी आमदार दादाभाऊ कळमकर,
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सचिव जी.डी.खानदेशे आणि मानसिक विकलांग महिला आणि बालकांसाठी सामाजिक काम करणारे डॉ.राजेंद्र धामणे व डॉ.सुचेता धामणे यांना जाहीर झाला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, मराठा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंजी. विजयकुमार ठुबे व व्हा. चेअरमन सतीश इंगळे यांनी सांगितले की,
अहमदनगर जिल्हा मराठा सेवा संघ व अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने गेली पाच वर्षापासून मराठा समाजात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना छत्रपती शिवाजी महाराज मराठा भूषण जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो.
यावर्षी हा पुरस्कार सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नगर शहराचे माजी आमदार व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर तसेच सामाजिक व शैक्षणिक बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे यांना देण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे समाजाला भूषण ठरावे असे आदर्शवत काम करणारे डॉक्टर राजेंद्र धामणे व डॉक्टर सौ सुचेता धामणे यांना ‘छत्रपती संभाजी महाराज समाजरत्न पुरस्कार’ देण्यात येणार आहे. आज या पुरस्काराची आम्ही घोषणा करीत आहोत लवकरच कार्यक्रम घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात येईल असे त्यांनी सांगितले
गेली सात वर्षापासून असे पुरस्कार देण्यात येत असून आत्तापर्यंत गेली अनेक वर्षापासून मराठा समाजाला एकत्र करणारे कै. बबनराव मिस्कीन यांना मरणोत्तर मराठा समाज भूषण पुरस्कार तसेच मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. माधवराव (आबा) मुळे, रामनाथ (अण्णा) वाघ,
सामाजिक क्षेत्रात व बँकिंग क्षेत्रात कार्य केलेले स्व. रावसाहेब अनभुले, अंबिका महिला बँकेच्या संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ लेखिका मेधाताई काळे, अंबिका महिला बँकेच्या संस्थापक संचालिका व शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य कार्य करणार्या प्रा. पुष्पाताई मरकड,
ज्येष्ठ विचारवंत माजी प्राचार्य खासेराव शितोळे, मराठा सेवा संघात उल्लेखनीय कार्य करणारे प्राध्यापक पोपटराव काळे व जिजाऊ ब्रिगेडच्या माजी अध्यक्षा व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शोभाताई जाधव यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पतसंस्थेच्या मार्फत आर्थिक कार्य करत असताना वेगवेगळे सामजिक उपक्रम हाती घेतले जातात या पुढील काळातही सामाजिक कार्यक्रमावर भर राहील. अहमदनगर जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्थेने 21 वर्षांमध्ये वीस कोटी पन्नास लाखाच्या ठेवी, 45 लाखाचे भाग भांडवल,
16 कोटी 50 लाखाचे कर्ज वाटप केले असून ऑडिट वर्ग अ आहे. सध्याच्या परिस्थितीत सगळीकडे आर्थिक संकट असतानासुद्धा पतसंस्थे कडे या वर्षी चार कोटी चे ठेवी वाढल्या असून कर्ज वसुली सुद्धा चांगली आहे अहमदनगर जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य शाखा माळीवाडा याच्यासह मार्केटयार्ड, भिंगार,
संगमनेर,नेवासा, पाथर्डी येथे शाखा आहेत महाराष्ट्रामध्ये अल्पावधीत नावारुपास आलेली आणि सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारी पतसंस्था ही मराठा सेवा संघ प्रणित असून सर्व समाजाला आर्थिक पत देणारी आहे.
मराठा सेवा संघाच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रम दरवर्षी राबवले जातात तसेच सकल मराठा क्रांती मोर्चा मध्ये व मराठा समाजातील प्रत्येक आंदोलनात अहमदनगर जिल्हा मराठा सेवा संघाचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेशराव इथापे यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम