अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांच्या उपस्थितीत मंगळवार दि.१३ रोजी अहमदनगर शासकीय विश्रामगृह येथे मराठा आरक्षण पुढील दिशा व अखिल भारतीय छावा संघटना ज़िल्हा आढावा बैठक पार पडली. .
या वेळी नानासाहेब जावळे पा.बोलतांना म्हणाले की,मराठा आरक्षण ही जबाबदारी पूर्ण पणे राज्य शासनाची आहे. मराठा आरक्षणचा राज्यशासनाने अक्षरशः गळा घोटलेला आहे.मराठा आरक्षणासाठी मराठ्यांनी कुणा सोबत लढाई करावी हे राज्य सरकारने सांगावे.
मराठा समाज जास्त संख्येने महाराष्ट्रात राहतो म्हणून ही जबादारी राज्यवर येते. राज्य सरकारने काल परवा असा ठराव घेतला की केंद्रात ५०%च आरक्षण रद्द करावे आणि मराठा आरक्षण दयावे जर तसच करायच होत
तर सर्वात जास्त काळ काँग्रेसने देशात सत्ता उपभोगली. सत्तेत होते तेव्हा काय झाले होत मराठा आरक्षण द्यायला. त्यामुळे सत्ताधारी मराठा समाजाची दिशा भूल करत आहे. नगर जिल्ह्यात कोपर्डी सारखी घटना घडून
५ वर्ष पूर्ण होवून देखील आरोपींना अद्याप पर्यंत शिक्षा झालेली नाही.गोरगरीब जनतेचा अजूनही न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे.ज्या दिवशी सर्वसामान्य जनतेचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडेल
त्या दिवशी जनता कायदा हातात घेवून नराधमांना धडा शिकवल्या शिवाय स्वस्थ बसनार नाही. मराठा आरक्षणा बद्दल राष्ट्रवादी पक्षाची भुमीका दुट्टपी वाटत आहे.तसेच शेतकऱ्यानंचा ७/१२ कोरा करण्याच आमिष या सत्ताधार्यांनी जनतेला दाखवून जनतेची दिशाभूल केली आहे.
पुढे बोलतांना नानासाहेब म्हणाले अखिल भारतीय छावा संघटना महाराष्ट्रत शांत बसणार नाही. मराठा आरक्षण व खोट्या अॕट्रॉसिटी गुन्ह्यांबद्दल छावा येणाऱ्या ९ ऑगस्ट क्रांतीदीना पासून अ.भा.छावा संघटना राज्यात आक्रमक भूमिका घेवून दंडूके हातात
घेवून मोर्चे काढणार आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे (नांदेड),विद्यार्थी आघाडीचें प्रदेश अध्यक्ष विजयभैय्या घाडगे(लातूर), केंदीय सहकार्याध्यक्ष भिमराव मराठे (जालना) यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीस विद्याथी आघाडीचे विजयकुमार घाडगे पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे पा. जि.संघटक दादा बडाख, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष विजय बडाख, राहुरी तालुका अध्यक्ष रमेश पाटील म्हसे,
शहराध्यक्ष शरद बोंबले, दौलत गायकवाड, वि आ तालुका अध्यक्ष,प्रदीप पटारे, शाखा संघटक,अक्षय पटारे ,तालुका उपाध्यक्ष गणेश धुमाळ,राजू गुंजाळ,वडाळा शाखा अध्यक्ष किरण उघडे,शेतकरी आघाडीचे निलेश बनकर,
जिल्हा मार्गदर्शक बहिरनाथ मामा गोरे,शहर उपाध्यक्ष मनोज होंड,अक्षय बोरुडे राहुल तारक,मयूर पटारे, भाऊसाहेब मांडगे,तालुका कार्याध्यक्ष राहुरी अमोल वाळुंज, सोनू सागर,कारेगाव शाखा अध्यक्ष रोहित उंडे,नागेश जाधव,
एकलव्य संघटना तालुकाध्यक्ष सुभाष मोरे, गोरक्षनाथ उंडे, किरण गुंजाळ,अनिकेत काकडे,गोरख म्हसे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन खंडागळे,राहता तालुका अध्यक्ष वीरेश बोठे, नगर तालुका अध्यक्ष किरण फटांगरे,
जिल्हा सचिव गणेश गायकवाड,महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेखाताई सांगळे,जिजाऊ ब्रिगेडच्या अनिताताई काळे,कोपरगाव अध्यक्ष परिमल दवंगे,जिल्हा सरचिटणीस प्रवीण देवकर,नितीन कदम,महेंद्र शेळके आदी उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम