अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- कोरोनाने जिल्ह्याची पाठ सोडली नाही तोच म्युकर मायकोसिस नावाच्या रोगाने जिल्ह्यात प्रवेश केला. आता कोरोनापाठोपाठ या रोगाची रुग्णांच्या संख्येत देखील नगर जिल्ह्यात वाढ होताना दिसून येत आहे.
जिल्ह्यात म्युकोरमायकोसिसच्या आतापर्यंत 180 रूग्णांची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी दिली.
म्युकोरमायकॉसिसचे लक्षण आढळताच उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले आहे. जिल्ह्यात करोना पाठोपाठ म्युकोरमायकॉसिस आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत.
करोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकोरमायकोसिस आजाराची लक्षणे ही आता मोठ्या प्रमाणात जाणवू लागलेली आहे. वाढत्या रुग्णांमुळे त्यावरील औषधाचा तुटवडा निर्माण झाला आहे.
म्युकोरमायकोसिसवर दोन इंजेक्शन प्रभावी ठरले आहे. परंतु, जिल्ह्यासाठी त्यांचा पुरवठा अल्प प्रमाणात होत आहे.
यासाठी लागणार्या औषधांसाठी जिल्हा प्रशासन शासनाकडे प्रयत्न करत आहे. दरम्यान म्युकरमायकोसिसने जिल्ह्यात आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम