अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ बोठे याचे नातलग तसेच हितचिंतक यांच्याकडून गेल्या पंधरा दिवसांपासून पाळत ठेवण्यात येत असून या लोकांपासून आपल्या जिवितास धोका असल्याची तक्रार जरे यांचे वकील अॅड. सचिन पटेकर यांनी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.
जिवितास धोका होण्याची भिती असल्याने आपणास पारनेर व नगर येथील न्यायालयीन कामकाजादरम्यान पोलिस संरक्षण देण्याची मागणी पटेकर यांनी केली आहे. निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, दि. २९ जुलै रोजी बोठे याची पत्नी सविता यांनी आपणाविरोधात काहीही कारण नसताना तक्रार अर्ज दाखल केला आहे.

सदर घटनेशी आपला काहीही सबंध नसतानाही आपणाविरोधात तक्रार करण्यात आली आहे. वकील म्हणून प्रामाणीकपणे काम करीत असताना दि. २७ रोजी आपण न्यायालयीन कामकाज तसेच महत्वाच्या कागदपत्रांच्या नकला मिळविण्यासाठी आपण पारनेर न्यायालयात गेलो होतो.
अशा परिस्थितीत असे आरोप होणार असतील तर काम करणे मुश्किल होणार आहे. न्यायालयीन कामकाजासाठी पारनेर येथे जाणे आपल्यासाठी धोकादायक ठरणार आहे. त्यासाठी अंगरक्षक असणे आवष्यक असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपासून आपल्या असे निदर्शनास आले आहे की माझ्यावर कोणीतरी पाळत ठेवत आहे.
जिल्हा न्यायालयात कामकाज करीत असताना माझ्यावर पाळत ठेवण्यात येत आहे. पाचव्या मजल्यावरून वाहने पार्कींगपर्यंत काही त्याच त्याच व्यक्ती आजूबाजूला फिरताना दिसून येत आहेत. आपल्या वाहनापासून काही अंतरावर आपण येण्याची काही व्यक्ती वाट पाहत असतात.
मी कोणाशी बोलतो, काय करतो याकडे या व्यक्तींचे बारीक लक्ष असते याची जाणीव होते. गेल्या पंधरा दिवसांपसून हे प्रकार सातत्याने घडत असून या व्यक्तींपासून आपल्या जिवतास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या लोकांच्या भितीमुळे न्यायालयाचे कामकाज करणे मुश्किल झाले आहे.
पारनेर न्यायालयातही असाच अनुभव आला. या लोकांना जाब विचारल्यास ते माझ्या जिविताचे बरे वाईट करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. ठराविक लोकांकडून ठेवण्यात येत असलेल्या पाळतीच्या पार्श्वभुमिवर ज्यावेळी पारनेर न्यायालयात कामकाजाकरीता जाताना अंगरक्षक असणे आवष्यक आहे.
दररोजच्या न्यायालयीन कामकाजादरम्यान अंगरक्षकाची आवष्यकता नसली तरी ज्यावेळी रेखा जरे हत्येसबंधी न्यायालयीन कामकाज असेल त्या त्या वेळी पोलिस संरक्षण देण्याची विनंती पटेकर यांनी केली आहे.
या गुन्हयाचे स्वरूप मोठे असून काही घात पात होण्याची मी का वाट पाहू ? घातपात झाल्यानंतर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवालही पटेकर यांनी केला आहे.
मागील आदेशाप्रमाणे ज्या ज्या वेळी जिल्हा व पारनेर न्यायालयात या गुन्हयासंदर्भात जावे लागेल, तसेच महत्वाच्या साक्षिदारांचे जाब जबाब होईपर्यंत शासनाच्या खर्चाने पोलिस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम