दाऊद इब्राहिमचा हस्तक दानिश चिकनाच्या मुसक्या आवळल्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-राजस्थान पोलिसांच्या मदतीनं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा हस्तक मानल्या जाणाऱ्या दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकना याच्या मुसक्या आवळल्या.

त्याला राजस्थानातून अटक करण्यात आली. दानिशविरोधात एनसीबी कडे २ तर डोंगरी पोलीस ठाण्यात ६ गुन्हे दाखल आहेत.

तो मुंबई येथील डोंगरी परिसरात ड्रग्सची फॅक्टरी चालवत होता. एनसीपी ने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील छापेमारी दरम्यान दाऊदचा साथीदार चिंकू पठाण ला अटक केली.त्याच्याकडे चौकशी केली असता त्या दरम्यान दानिश चिकनाचे नाव समोर आले.

मुंबई एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा दानिशला अटक करण्यासाठी एनसीबीचे पथक ड्रग्स फॅक्टरीत पोहोचले तेव्हा तो भिंतीवरून उडी मारून पळून गेला.

दानिश पळून गेल्यानंतर एनसीबीचे पथक त्याच्या मागावर होते. त्यानंतर त्याचे लोकेशन ट्रेस केले असता ते राजस्थानमध्ये सापडत होते.

जेव्हा एनसीपीने दानिशला अजमेरमध्ये घेराव घातला, तेव्हा तिथूनही तो चकवा देऊन पळून गेला. पण नंतर कोटा मध्ये दानिश चे ठिकाण सापडल्यावर कोटा पोलिसांना कळवण्यात आलं आणि दानिशला जेरबंद केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe