अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- देशात कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असताना डेल्टा प्लस या नव्या कोरोना अवताराने भीती वाढवली आहे. देशाभरात डेल्टा प्लस या म्युटेन्टचे रुग्ण आढळत आहेत.
त्यातच मध्यप्रदेशातून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. उज्जैनमध्ये या विषाणूची बाधा झालेल्या महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.
विशेष म्हणजे या महिलेच्या पतीने कोरोनाप्रतिबंधक लस घेतली होती, तो मात्र पूर्णपणे सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे.
मध्यप्रदेशात आतापर्यंत डेल्टा प्लसचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर या महिलेच्या जिनोम सिक्वेंसिंगसाठी सॅम्पल घेण्यात आला होता. त्यानंतर या महिलेला कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटची बाधा झाल्याचे समोर आले.
डेल्टा व्हेरियंटचा हा पहिलाच मृत्यू असल्याने चिंता वाढली आहे. मध्यप्रदेशात आतापर्यंत 5 डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद झाली आहे. यातील दोन रुग्ण भोपाळमधील आहेत, तर उर्वरित रुग्ण उज्जैनमध्ये आढळून आले आहेत.
शिवाय राज्यातील डेल्या प्लस व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. उज्जैनचे नोडल अधिकारी डॉ. रौनक यांनी सांगितले की, डेल्टा प्लस व्हेरियंटची बाधा झाल्याने एका 23 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम