अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे २४ रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला पहाटे ३ वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.
एसीचा स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याची माहिती डॉक्टर दिलीप शाह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. रुग्णालयात सेंट्रलाइज एसी असून दोनच मिनिटात आग सगळीकडे पसरली अशी माहिती त्यांनी दिली.

चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. यावेळी अतिदक्षता विभागात १७ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी १३ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला. रात्री ३ वाजता लागलेल्या आगीनंतर रुग्णालयात धावपळ सुरु झाली होती.
आयसीयूमध्ये एकूण १७ रुग्ण होते. यामधील चौघे जण जे चालू शकत होते त्यांनी स्वत:ची सुटका करुन घेतली. मात्र इतर रुग्ण आपला जीव वाचवू शकले नाहीत आणि आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला,
अशी प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी दिली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं आहे.
दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडल्या नंतर वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त घटनास्थळी उपस्थित नव्हते.
केवळ स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीच इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले. मृतांमध्ये पाच महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे.
मृतांची नावं –
- उमा सुरेश कनगुटकर
- निलेश भोईर
- पुखराज वल्लभदास वैष्णव
- रजनी आर कडू
- नरेंद्र शंकर शिंदे
- जनार्दन मोरेश्वर म्हात्रे
- कुमार किशोर दोशी
- रमेश टी उपयान
- प्रविण शिवलाल गोडा
- अमेय राजेश राऊत
- रामा अण्णा म्हात्रे
- सुवर्णा एस पितळे
- सुप्रिया देशमुखे
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|