अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- एकीकडे दिल्लीत कृषी कायदे मागे घेण्यासाठी मागील एक ते दीड महिन्यापासून आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे शेतमाला अत्यल्प दर मिळत असल्याने झालेला खर्च देखील हातात पडत नाही. त्यामुळे परत एकदा कर्जाला कंटाळून शेतकरी आपली जीवनयात्रा संपवत असल्याचे विदारक चित्र सध्या दिसत आहे.
याबाबत सविस्तर असे की, शेवगाव तालुक्यातील एरंडगाव भागवत येथील पांडुरंग हरिचंद्र भागवत( वय ४८ वर्षे ) गेल्या अनेक वर्षापासून शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा चांगला भाव मिळत नव्हता त्यामुळे शेतात केलेला खर्च देखील हातात पडत नसल्याने ते हाताश झाले होते.
दरम्यान मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेतले होते. मात्र सतत पडलेले शेतमालाचे दर यामुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला होता. परिणामी आपण घेतलेले कर्ज परत फेडु न शकल्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले होते. त्यामुळे कर्जबाजारी झाल्यामुळे या कर्जाला कंटाळून पांडुरंग भागवत यांनी दि.७ फेब्रुवारी रोजी राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
त्यासंदर्भात शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved