अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- वांजोळी, पांढरीपुल (ता.नेवासा) येथे बुधवार दि. १ सप्टेंबर रोजी संत किसनगिरी ॲग्रो फार्मर्स प्रोडयूसर कंपनीचे लोकार्पण महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते सकाळी १० वा.होणार असून या कार्यक्रमास पद्मश्री पोपटराव पवार हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच आ.संग्रामभैय्या जगताप, महंत सुनिलगिरी महाराज, नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.सुनिताताई गडाख आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती कंपनीचे मुख्य प्रवर्तक पत्रकार समीर दाणी यांनी दिली.

कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सभासद करुन त्यांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून शेतकरी हितासाठी सर्वांना एकत्र करण्याचा हा प्रयत्न असल्याचे श्री. दाणी म्हणाले. गावातील जेष्ठ, अनुभवी ग्रामस्थांच्या सूचना आणि सहकार्यातून ही कंपनी उभी राहणार असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमास माजी महापौर बाबासाहेब वाकळे, जेष्ठ अस्थिरोगतज्ञ डॉ.सुभाष म्हस्के, उद्योजक मच्छिंद्र पागीरे, जेष्ठ पत्रकार राजेंद्र झोंड, सुधीर लंके, शिवाजी शिर्के, महाएफपीसीचे योगेश थोरात, कृषी अधिकारी शिवाजी जगताप, काशीनाथ पागीरे, मुरलीधर पागीरे, तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय डमाळे, पोनि अनिल कटके, सपोनि रामचंद्र करपे, चेअरमन बद्रीनाथ खंडागळे,
सरपंच अप्पासाहेब खंडागळे, उपसरपंच मंगेश पागीरे, रामभाऊ खंडागळे, उद्योजक सतिश वाकळे, चंद्रकांत उरमुडे, शंतनु पाटील, संदीप थोरात, नगरसेवक दत्ताशेठ सप्रे, नितीन बारस्कर, गुलाब वाकळे, महेश काकडे, आदिनाथ काळे, शाम ढेरे, विशाल भालसिंग,
सचिन शिंदे, बाळासाहेब खंडागळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी हरी भवार यांनी केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम