अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्य व वंचित घटकांना आधार देण्याची संकल्पना घर घर लंगर सेवेने कृतीत उतरवली. मागील वर्षापासून गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे. अन्नदान पर्यंत न थांबता सर्वसामान्यांची गरज ओळखून त्यांना सेवा पुरविण्याचे केले.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत रुग्णांसाठी अत्यावश्यक बनलेल्या ऑक्सिजनची निशुल्क सेवा लंगर सेवेने पुरवून गरजूंना जीवदान दिले. वैद्यकिय क्षेत्रात देखील दर्जेदार सेवा देऊन लंगर सेवेने दाखवलेले धाडस व समाज कार्याची तळमळ कौतुकास्पद असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
घर घर लंगर सेवेच्या ऑक्सिजन सेवेत दाखल झालेले बारा ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी डॉ.एस.एस. दीपक, डॉ. अमित बडवे, डॉ. प्रशांत पठारे, डॉ. सतीश सोनवणे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, प्रितपालसिंग धुप्पड, राहुल बजाज, राजेंद्र कंत्रोड, सतीश गंभीर, विपुल शहा, किशोर मुनोत,
मनोज मदान, राहुल शर्मा, नारायण अरोरा, राजभीरसिंग सिंधू, जय रंगलानी, मन्नू कुकरेजा, करण धुप्पड, कैलाश नवलानी, कबीर धुप्पड, सिमर वधवा, सुनिल छाजेड, प्रशांत मुनोत, अनिश आहुजा, राजवंश धुप्पड, बलजित बिलरा, अर्जुन मदान, सुनिल थोरात, कमलेश गांधी, गुरभेजसिंग बजाज, गौरव नय्यर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार जगताप म्हणाले की, संकट आल्यावर सर्व नगरकर एकत्र आले आणि एकमेकांना आधार देण्याचे कार्य केले. तर लंगर सेवेने शहरात मोठे सामाजिक कार्य उभे केले. तीसरी लाट थोपवण्यासाठी नगरकर सज्ज आहेत.
कोरोनाची तीसरी लाट येणार नाही, यासाठी नियोजन व काळजी घेणे आवश्यक आहे. लंगर सेवेने निस्वार्थ भावनेने दिलेली सेवेची दखल राज्य व केंद्र सरकारने घेण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविकात हरजितसिंह वधवा यांनी कोरोनाची लाट कमी झाली असली तरी कोरोनाने बरे झालेल्या रुग्णांना पुर्णपणे चांगले होण्यासाठी ऑक्सिजनची गरज भासत आहे.
यासाठी लंगर सेवेच्या ऑक्सिजनला मागणी असून, सर्वसामान्य घटकांना ही सेवा निशुल्क दिली जात आहे. कोरोना रुग्ण असे पर्यंत ही सेवा सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.एस.एस. दीपक म्हणाले की, सर्वसामान्य जनतेसाठी पळणारा आमदार नगरकरांना कोरोनाच्या संकटकाळात पहावयास मिळाला.
रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यापासून तर बरे होऊन घरी जाण्यापर्यंत त्यांचा पाठपुरावा सुरु होता. रुग्णवाहिकेबरोबर येऊन रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे काम आमदार संग्राम जगताप यांनी केले. संकटकाळात सर्वांना धीर दिला. देशावर संकट ओढवले असताना सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे.
लंगर सेवेची सेवा लंगर पुरती मर्यादीत न राहता जीवन देणारी सेवा त्यांच्या हातून घडली असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अमित बडवे यांनी कोरोना काळात रुग्णांना धीर व सर्वसामान्यांना आधार देणे आवश्यक होते. आमदारांनी धीर देण्याचे कार्य केले तर लंगर सेवेने मदतीचा हात दिल्याचे सांगितले.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना घर घर लंगर सेवेच्या वतीने गरजू रुग्णांसाठी 25 ऑक्सिजनचे सिलेंडर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घरात वापरण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यापुढे एक पाऊल टाकत 12 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन देखील या सेवेत समाविष्ट करण्यात आले.
अमेरिका व न्यूझीलँड मधून 12 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनची मदत घर घर लंगरसेवेला अमेरिका येथील राज खालसा गुरुद्वाराच्या वतीने 9 लाख रुपये किंमतीचे 10 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनची मदत देण्यात आली. यासाठी तरणदीपसिंग धुप्पड यांचे सहकार्य लाभले.
तर न्यूझीलँडचे सांसद कवलजितसिंग बक्षी यांनी दोन कॉन्सट्रेटर मशीनची मदत पाठवली आहे. घर घर लंगरसेवेच्या वतीने निशुल्क ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन मिळवण्यासाठी 9423162727, 9890671671 या दोन नंबरवर संपर्क साधायचा आहे. रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल, डॉक्टरचे संमपतीपत्र व खालवलेल्या ऑक्सिजन पातळीची माहिती देणे बंधनकारक आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम