‘काम नसल्याने’ कर भरण्यास विलंब !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- अभिनेत्री कंगना राणावत बॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री असूनही ती वेळेवर कर भरण्यास असमर्थ ठरली आहे.

कारण तिच्याकडे ‘कोणतेही काम’ नव्हते, असे तिने ट्विट करीत स्पष्टीकरण दिले आहे.कंगनाने मंगळवारी रात्री आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, सरकारला एकूण करापोटीच्या निम्म्या पैशांची ती अजून देय आहे.

कंगना म्हणाली की, माझ्या उत्पन्नातील सुमारे ४५ टक्के कर भरते. मी सर्वात जास्त कर भरणारी अभिनेत्री असूनही मी कामाच्या अभावामुळे माझी नोकरी गमावली आहे. वर्षाचा निम्मा कर भरला, आयुष्यात मला पहिल्यांदाच कर भरण्यास उशीर होत आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गापासून नुकतीच सावरलेली अभिनेत्री म्हणाली की, सरकार थकबाकीवर व्याज वसूल करते आहे आणि त्याचे स्वागत आहे.

ती पुढे लिहिते की, कर भरण्यास मला उशीर झाला आहे, परंतु या थकित रकमेवर सरकार व्याज आकारत आहे, तरीही मी या निर्णयाचे स्वागत करते. ही वेळ आमच्यासाठी वैयक्तिकरीत्या कठीण असू शकते, परंतु काळानुसार आम्ही मजबूत बनू शकतो, असेही तिने म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News