युवकाची आत्महत्या नसून, घातपात असल्याचा संशय युवकाच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- घोडेगाव कौठा येथील युवकाची आत्महत्या नसून, घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करुन सदर प्रकरणी तपास करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालय जवळील भूजलसर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण केले.

या उपोषणात आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, कार्याध्यक्ष दानिश शेख, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, युवक शहर अध्यक्ष ऋषी विधाते, विजय साळवे, संतोष पाडळे, राहुल (पप्पू) डोंगरे, भुषण भिंगारदिवे, किरण डोंगरे, राहुल घाणे, राहुल बनकर, किशोर जाधव, योगेश डौले, सतीश अनारसे, विकी पवार, संदीप भिंगारदिवे, सुरज शिरसाठ, ऋतिक नरवडे,

निलेश चव्हाण आदिंसह युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोडेगाव कौठा (ता. नेवासा) येथील युवक दिगंबर घनश्याम राऊत याचा मृतदेह दि.8 जुलै रोजी गट नंबर 135 या शेतातील विहिरीत आढळून आला. पोलीस स्टेशनला आत्महत्येची नोंद झाली आहे.

मात्र सदर युवकाने आत्महत्या केली नसून, सदर मृत्यू संशयास्पद असल्याचे आरपीआय व उपोषणकर्ते युवकांचे म्हणने आहे. या प्रकरणी मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करुन देखील पोलीस तपास करत नाही.

तर प्रशासन देखील या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत नसल्याने दिगंबर राऊत यांच्या मृत्यूची सखोल चौकशी होण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe