अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-सावेडी उपनगराच्या पश्चिम भागास विकासाला चालना देण्याची मागणी भारतीय जनसंसद, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन व पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे करण्यात आली आहे.
सावेडीच्या पश्चिम भागात मुलभूत सुविधा असून, मनपाच्या माध्यमातून विकासाला चालना दिल्यास स्वतंत्र उपनगर निर्माण होणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली. सावेडीचा छपाट्याने विकास झाला असून, नवीन शहर म्हणून हे उपनगर पुढे येत आहे.
सावेडीचा पश्चिम भाग बोल्हेगावला जोडणारा आहे. या परिसरात रस्ते, वीज व पाणी या मुलभूत सुविधा आहे. सध्या मोठ्या प्रमाणात जागा असून, त्या जागेत कचरा साचलेला आहे. या भागात घर बांधणीस चालना दिल्यास उपनगर म्हणून विकास साधला जाणार आहे.
या भागात बाजारपेठ उभी राहून व्यापाराला चालना मिळणार आहे. तर अनेकांना रोजगार देखील मिळणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या पाऊसाळ्यात या भागात संघटनेच्या वतीने रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षरोपण केले जाणार आहे.
तसेच भाजी मार्केटची देखील मागणी करण्यात येणार असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या मागणीसाठी अॅड. गवळी, ओम कदम, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, कॉ. बाबा आरगडे आदी प्रयत्नशील आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|