अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नागरिक घराबाहेर पडत नाही आहे. स्वतःच्या जीवाची काळजी असल्याने व कोरोनाचे संक्रमण होऊ नये याची सर्वजण काळजी घेत आहे.
मात्र कोरोनाच्या भयाण परिस्थितीही पशुधन वाचवण्यासाठी बाहेर पडणारे खासगी डॉक्टरांसाठी स्वाभिमानी महिला मराठा महासंघाच्या वतीने एक महत्वपूर्ण मागणी केली आहे. अत्यावश्यक सेवेतील बहुतांश सेवकांना कोरोना योद्धा किंवा फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्यात येतो.
आता हाच दर्जा खासगी पशुवैद्यकीय डॉक्टारांना दिला जावा अशी मागणी त्यांनी केली आहे. खासगी पशुपदविका धारक डॉक्टर करोनाच्या भितीने गाय, म्हशींच्या उपचारासाठी शेतकर्यांच्या दारात जात नसल्याने दुध उत्पादक शेतकर्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
प्रशासनाने तातडीने ही सेवा देत असलेल्या खासगी डॉक्टरांच्या लसीकरणास परवानगी द्यावी अशी मागणी स्वाभिमानी महिला मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. नेवासा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुपालन असून शेतकर्यांना या दुधधंद्याचा मोठा आधार आहे.
मात्र सध्या करोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून अनेक खाजगी पशूवैद्यकिय डॉक्टर संसर्गाच्या भितीने फिरकत नाहीत.
यामुळे काही शेतकर्यांची जनावरे उपचाराअभावी दगावली आहेत. प्रशासनाने या सेवेत असलेल्यांना वयाची अट न लावता ‘फ्रन्ट लाईन वर्कर’चा दर्जा देवून लसीकरण करुन घ्यावे अशी मागणी स्वाभिमानी मराठा महिला महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम