अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोनाची लागण झाल्यामुळे आसाराम बापू यांना कारागृहातून पॅरोलवर मुक्त करण्याच्या मागणीसाठी हिंदुराष्ट्र सेना व श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व महात्मा ज्योतिबा फुले युवा मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
आसाराम बापू मागील आठ वर्षापासून जोधपूर कारागृहात बंद आहे. बापू यांना कोरोनाची लागण झाली आहे.
सुप्रीम कोर्टाने कोविंड 19 च्या पार्श्वभूमीवर कारागृहातील कैद्यांनबाबतीत दिलेल्या एका आदेशान्वये 70 वर्षावरील विविध व्याधिग्रस्त कैदी पॅरोलवर मुक्त करण्यात यावेत असे नमूद केले आहे.
सामाजिक न्यायमध्ये विषमता दिसते म्हणून बापू यांचे वय व त्यांना असलेले आजार याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना पॅरोलवर त्वरित सुटका करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम