अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :- हातावर पोट असलेल्या विडी कामगारांना घरी विडी बनवण्यासाठी तंबाखू व पाने देण्याकरिता विडी कारखाने सुरु ठेवण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे लाल बावटा कामगार युनियनच्या (आयटक) वतीने देण्यात आले.
यावेळी संघटनेचे सचिव अॅड.कॉ. सुधीर टोकेकर, इंटकचे कविता मच्चा, विनायक मच्चा उपस्थित होते. विडी कामगार हातावर पोट असलेले श्रमिक कष्टकरी आहेत. घरच्याघरी विडी बनवून ते कारखान्यात देऊन मजुरीवर आपला उदरनिर्वाह करीत असतात.
विडी बनविण्यासाठी कारखान्यातून त्यांना पाने व तंबाखू हा कच्चा माल घ्यावा लागतो. शहरात दोन मोठे विडी कारखाने असून, त्यांच्या माध्यमातून हजारो विडी कामगार आपला उदरनिर्वाह करीत आहे.
विडी कारखाने बंद ठेवल्यास हजारो विडी कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणार आहे. राज्य सरकारने कारखाने सुरू ठेवण्याचे व आवश्यक कामगार संख्या ठेवण्याचे निर्देश दिले आहे.
तरी शहरातील विडी कारखाने विडी कामगारांना माल घेण्यासाठी व बनवलेल्या विड्या देण्यासाठी सुरु ठेवण्याची मागणी लाल बावटा कामगार युनियनच्या (आयटक) वतीने करण्यात आली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|