भिंगार कॅम्प पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन येथील सहाय्यक फौजदार शेख मोईनुद्दिन इस्माईल , पोलीस नाईक अंबादास विश्वास पालवे यांनी गुन्हयातील आरोपी यांचे सोबत हाथ मिळवणी करुन पोलिस निरीक्षक देशमुख यांचे नेतृत्वाखील माझे पतीला जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे.

सदर गुन्हयामध्ये दोन्ही पोलिस आरोपी असुन त्यांना आरोपी म्हणुन शामील केलेले नाही. भिंगार कॅम्प पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी आज जिल्हा पोलीस उपअधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याकडे समस्त नागरिकांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.

मुकुंद नगर परिसरातील अनेक नागरिक निवेदन देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आलेले होते यावेळी त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अग्रवाल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन या घटनेचा तपास तात्काळ करा व संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

रुक्सार बिराजदार व आलेल्या समस्त नागरिकांच्या वतीने या वेळी दोन स्वतंत्र निवेदने देण्यात आलेली आहे. यावेळी रुक्सार बिराजदार, जसलीन शेख, ,रोशन शेख, राज मोहम्मद शेख, खान बाबा, असंद इराणी, अज्जू इराणी, मोहबीन शेख, शमस समीर खान आदींसह नागरिक यावेळी उपस्थित होते.

निवेदनामध्ये म्हटले आहे की ,गुन्हा रजि नंबर ३२८ मधील फिर्यादी रुक्सार बिराजदार हिने दिनांक १५/०८/२०२१ रोजी ७.३० ते ८.०० वाजण्याच्या दरम्यान पतीस जिवे मारण्याचा पर्यत्न केल्या बाबती भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन, येथे गुन्हा रजि नं. ३२८ नोंदविलेला आहे.

सदर गुन्हयामधे भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन येथील सहाय्यक फौजदार शेख मोईनुद्दिन इस्माईल व पोलीस नाईक अंबादास विश्वास पालवे यांनी गुन्हयातील आरोपी यांचे सोबत हाथ मिळवणी करुन पोलिस निरीक्षक देशमुख यांचे नेतृत्वाखील माझे पतीला जिवे मारण्याचा पर्यत्न केलेला आहे.

सदर गुन्हयामध्ये दोन्ही पोलिस आरोपी असुन त्यांना आरोपी म्हणुन शामील केलेले नाही. फिर्यादी घटनेच्या दिवशी रात्री १०.०० वाजल्यापासुन गुन्हा नोदविण्या बाबत देशमुख यांना विनंती करीत होत्या, परंतु देशमुख खोटे गुन्हे नोदंविण्यात व्यस्थ होते. पोलिसांनी रुक्सार हिची फिर्याद एका कच्च्या कागदावर फिर्याद नोंदवुन त्यांना त्यांनी सांगीतले की, ” तुम्ही आता थांबा मिटके ,

श्रीरामपुरावरुन येत आहे ते आल्यावर आपण गुन्हा नोंदवु” असे म्हणुन त्यांनी फिर्यादी सोबत आलेले मामा सासरे, मामी सासु यांचा जबाब घेण्यात वेळ वाया घातला होता. तो पर्यंत सहाय्यक फौजदार – शेख मोईनुद्दिन इस्माईल याची खोटी बनावट फिर्याद नोंदवुन घेऊन पोलिसांचा मार्ग मोकळा करून घेतला.

रुक्सार या विनंती करीत होत्या की माझा गुन्हा नोंदवुन घ्या व आरोपींना ताब्यत घ्या, परंतु पोलिस पुरावे नष्ट करण्याचे मार्गी लागलेले होते. घटनास्थळी पडलेले रक्त व पुरावा नष्ट होण्याची वेळ पाहणे चालले होते, पोलिस स्टेशनच्या अवघ्या ८०० मिटर अंतरावरील घटनास्थळी भिंगार कॅम्प पोलिस रात्री ३.४५ दरम्यान पोहचली.

घटना स्थळचा पंचनामा केला तोपर्यंत रक्त पुर्ण सुकले होते. पोलिसांनी सहाय्यक फौजदार शेख मोईनोद्दिन इस्माईल व पोलिस नाईक अंबादास पालवे याना क्लीन चिट देण्याचे उद्देशाने फिर्यादी १० ते १०.३० दरमयान पोलिस स्टेशन मध्ये हजर असतांना पोलिसांनी त्याचा जबाब घेऊन देखील एफ आय आर नोंदविली नाही.

प्रथम सहाय्यक फौजदार शेख मोईनोद्दिन इस्माईल याची खोटी फिर्यादी रात्री नोंदविला. तोपर्यंत सहाय्यक फौजदार शेख याने दोन खोटे साक्षीदार तयार केले. लोकेश इश्वरदास मेहतानी राहाणार सावतानगर, भिंगार, नगर व प्रणव सुधीर धर्माधिकारी रा. ब्राह्मणगल्ली, भिंगार असे त्या बनावट साक्षीदाराचे नाव आहे. सदर पोलिसांनी फिर्याद मध्ये कथन केलेले सर्व कथने खोटी आहे.

घटनास्थळी दोन ठिकाणी रक्त सांडलेले होते, आरोपी पळत असतातर त्याचे डोक्याला समोरील भागास जखम झाली असती व शरिरावर इतर ठिकाणी देखील जखमा झाल्या असते, सहाय्यक फौजदार त्याला थांबविण्याचा प्रयत्न करीत असेल त्याला देखील जखमा झाल्या असत्या, परंतु असे काही झालेले नाही. फिर्यादी प्रमाणे प्रत्यक्ष पाहाणारे साक्षीदार ३ आहेत. त्यामुळे ती फिर्याद पुर्णतः खोटी आहे. असे त्यामध्ये म्हणले आहे. फिर्यादी रुकसार बिराजदार फिर्याद देण्यास तयार असताना पोलिसांनी जाणुन बुजुन उशीर केला .

पोलिस गुंडाराजला सहाय्य केलेले आहे. मिटके तसेच इतर पोलिस अधिकारी पालिस स्टेशन मध्ये येता येता उशीर झाले. अधिकारी आल्यावर त्यांनी १ ते १.३० पोलिस स्टेशन मध्ये ठिय्या मारला आणि फिर्यादी सांगत असलेल्या तक्रारावर कोणतीही प्रतिक्रीया न देता चुप्पीची भुमीका अवलंबवली फिर्यादी हीने पोलिस निरीक्षक देशमुख व सहाय्यक फौजदार मोईनुद्दिन व पालवे यांच्या पासुन आणी आरोपी यांच्या पासुन संरक्षण मिळण्या बाबत विनंती केली होती , त्यांना सह आरोपी करण्याची विनंती केली होती परंतु तिचेकडे दुर्लक्ष करण्यात आले.

तसेच भिंगार कॅम्प पोलिसांच्या त्रासाला कंटाळून सी आय डी कडे तपास दयावा म्हणुन आग्रह केला, परंतु तुम्ही एस पी ला अर्ज करा असे सांगण्यात आले. अश्या प्रकारे फिर्यादी हिने पोलिस स्टेशन मध्ये १० ते १०.३० च्या दरम्यान फिर्याद देण्यास पोलिस स्टेशन मध्ये उपस्थित असताना वरीष्ठ पोलिस येत आहे तुम्ही थांबा सांगुन आरोपी पोलिस सहाय्यक फौजदार मोईनोद्दिन शेख याची फिर्याद घेऊन पोलिसांनी क्लिन चिट देण्याचा पर्यत्न करुन तपासात हेरफेर केल्या बद्दल पोलिस निरीक्षक देशमुख यांना निलंबित करणे आवश्यक असुन भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन मध्ये तपास न करता तपास सी आय डी कडे सोपविण्यात यावे.

अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आलेली आहे तसेच तपासी अधिकारी विशाल ढुमे यांना आरोपी ज्या घरात लपलेले आहे त्याचा पत्ता देऊन देखील त्यांनी आरोपीला पकडण्याचे सोडुन आम्हाला इथल्ला तपास करु दया आरोपी कोठेही जात नाही असे उडवाउडवीचे उत्तरे देऊन आरोपीस पसार होण्यास मदत केलेली आहे. त्यांना देखील सदर तपासातुन दूर करणे आवश्यक आहे.

सहाय्यक फौजदार मोईनुद्दिन शेख आणी पो/ना पालवे यांना आरोपी म्हणुन शामील आहे. हा प्रकार पाहता नगर करांसाठी धोक्याची घंटा आहे सादीक हा कोणताही सरहीत गुन्हेगार नाही, सादीक हा कौटुबिक गुन्हयात आरोपी होता व त्या गुन्हयातील इतर आरोपींचे अटक पूर्व जामीन मंजुर झालेले आहे. याचा देखील जामीन मंजुर होणारच होता. परंतु पोलिसांनी आरोपी समवेत हाथ मिळवणी करुन नांगरीकांना धोका निर्माण केलेला आहे.

नगर मध्ये पोलिसानी गुंडाराज स्थापन करण्याचा पर्यत्न केलेला आहे. तरी अशा पोलिसांना त्वरीत अटक करून आरोपी म्हणुन सामील करण्यात यावे , त्यांना निलंबीत करण्यात यावे जेणे करून सादीक याला न्याय मिळु शकते अन्याथा आम्ही उच्च न्यायालयात दाद मागु व अमरण उपोषण करु असा इशारा दिलेल्या निवेदनामध्ये दिला आहे.

दरम्यान पोलीस उपाधीक्षक अग्रवाल यांनी भिंगार कॅम्प मध्ये घडलेल्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवरून तसे आदेश दिले आहेत, चौकशी पूर्ण झाल्यानंतर उचित ती कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe