आ.रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-  कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचा कोविंड सेंटरमधील झिंगाट गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रोहित पवार यांच्या या डान्सवर भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी टीका केली आहे. “रोहित पवार यांनी किंवा इतर कोणत्याही नेत्यांनी कोरोनाचा प्रसार होईल असे वागू नये.

एक मंत्री लोकांना गोळा करतात, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, एका नेत्याने घरी लग्न आणि पार्टी करण्यासाठी लोक गोळा केले त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही. आता रोहित पवार असे वागले असतील तर शासनाने त्यांच्यावर करवाई करावी” असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

तसेच कोरोनाच्या काळात 12 आमदारांचा विषय कुठून आला? कोरोनाच्या पार्शवभूमीवर कोणत्याही निवडणुकीचं काम केलं तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार जबाबदार धरता.

आज कोरोनाच्या काळात आणि बालकांच्याही चिंतेच्या काळात यांना 12 आमदारांची आठवण कशी येते? महाविकास आघाडी सरकारचं केवळ राजकारणावर लक्ष आहे, यांना राजकारणाचा महारोग जडला आहे, अशी टीका भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

आशिष शेलार यांनी यावेळी खासदार संजय राऊत यांच्या टीकेचाही समाचार घेतला. भूत आणि भूताटकी ही नेमकं कसली वक्तव्य आहेत? रोज नुसतं 12-12 ची टिमकी वाजवली जातेय.

तुमचे काय 12 वाजलेत का? भुतानं जर फाईल पळवल्याचं तुमचं म्हणणं असेल तर मी सांगू इच्छितो की भाजप काहीही आज करत नाहीय. पण भाजपनं जर एक डाव भुताचा टाकला तर तुम्हाला खूप भारी पडेल हे राऊत यांनी लक्षात ठेवावं, असा जोरदार टोला आशिष शेलार यांनी लगावला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe