अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील जवळपास पंचवीस गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मिरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तालुका प्रशासनाने या भागात कोरणाचे वाढते रुग्ण लक्षात घेता येथे तात्काळ कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
सरपंच कमल सोलाट, उपसरपंच ॲड. अरुण बनकर, माजी सरपंच शशिकला सोलाट, शिवसेना नेते एकनाथ झाडे, भागिनाथ गवळी, ज्येष्ठ नेते महादेव कुटे, पोपटराव गवळी, माजी सरपंच संतोष शिंदे, कोरडे सर, अमोल मिरपगार,
अण्णासाहेब शिंदे, आत्मा कमिटीचे तालुका अध्यक्ष सुभाष गवळी, युवानेते अमोल मिरपगार, बापूसाहेब मिरपगार, अशोक झाडे, संभाजी सोलाट,महेंद्र सोलाट, राजू इनामदार, सत्तारभाई सय्यद, अण्णासाहेब गुंड यांनी ही मागणी केली आहे.
मिरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण २५ गावे असून या २५ गावांमध्ये एकूण १०५ ॲक्टिव्ह कोरणा रुग्ण आहे. यामध्ये सर्वाधिक २३ रुग्न लोहसर गावामध्ये आढळून आले आहेत.
तर कोल्हार १२, शिराळ ९, जवखेडे खालसा ९, मिरी ६ त्यामुळे या भागातील कोरोणा रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तालुका प्रशासनाने मिरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविड सेंटर सुरू केले तर या भागातील रुग्णांना पाथर्डी किंव्हा नगरला जाण्याची गरज भासणार नाही.
तिसगाव पाठोपाठ मिरी येथे देखील कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|