अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- मागासवर्गीय कुटुंबीयांना सार्वजनिक पाणवठे बंद करून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण झालेल्या कुटुंबाचे भेट घेऊन सातवण करण्यासाठी आलेले
ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार याची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेताना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष योगेश थोरात,
महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष जितेश जगताप, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, बीड जिल्हा कार्याध्यक्ष शरद सरोदे,
शहर जिल्हा अध्यक्ष अतुल भिंगारदिवे, युवक शहर अध्यक्ष सागर ठोकळ, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष अमर हिवाळे, जीवन कांबळे, अनिकेत ब्राह्मणे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय दीपक केदार म्हणाले की घटना जेव्हा घडली त्याच दिवशी ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केला पाहिजे होता जेव्हा कार्यकर्त्यांनी दबाव आणला त्यावेळेस ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात
आला व सदर प्रकरणी आरोपींना पाठीशी घालून कर्तव्यात कसूर करणाऱ्या राहुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व हवालदार यां
च्यावर देखील कारवाई करण्याची मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केली व अहमदनगर जिल्हा हा दलित अत्याचार म्हणून जिल्हा घोषित करावा व मूकबधिर मुलींवर हल्ला होत असेल
तर या जिल्ह्यात मुली सुरक्षित आहे का असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला व अहमदनगर जिल्ह्यात दलित सुरक्षित नाही व महाराष्ट्र अनुसूचित जातीच्या बौद्ध समूहाचा अस्तित्व धोक्यात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली ज्या दिवशी मागासवर्गीय कुटुंब यावर हल्ला झाला
अद्यापही एकही नेता आमदार पालकमंत्री भेट देण्यास आलेले नाही या संपूर्ण घटनेचा ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने निषेध व्यक्त केला पीडित कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले जाणार आहे
व या घटनेसंदर्भात भव्य आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला व आनंद व साळवे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे
तो मागे घेण्यात यावा या हल्ल्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी व पोलिस निरीक्षक व हवालदार यांचे निलंबन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम