‘भारत बंद’ला काँग्रेसचा पाठिंबा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली निदर्शने

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-  सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी. तसेच केंद्र सरकारने शेतकरी, कामगार विरोधी केलेले काळे कायदे रद्द करावेत, आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जाहीर केले आहे.

शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीने किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.

त्यावेळी काळे बोलत होते. ते म्हणाले की, शंभर दिवस उलटून गेले. सुमारे तीनशेहून अधिक शेतकऱ्यांचा उपोषणा दरम्यान दिल्ली सीमेवर मृत्यू झाला. पेट्रोल-डिझेलच्या किमती शंभरीला जाऊन पोहोचल्या.

भविष्यात गॅसची किंमत देखील हजारापर्यंत पोहोचल्यास आश्चर्य वाटू नये. मात्र केंद्रातील भाजप सरकार यावर कोणतीही ठोस पावले उचलायला तयार नाही ही देशवासीयांसाठी अत्यंत खेदाची बाब आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही पाठिंबा देत आहोत.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आ.डॉ.सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली शहरात केंद्राच्या विरोधात लढा अधिक तीव्र करण्याची भूमिका भविष्यात घेतली जाईल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe