अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने ग्रामपंचायत कर्मचार्यांनी मंगळवारी (10 ऑगस्ट) निषेध दिवस पाळून ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद समोर निदर्शने करण्यात आली.
ग्रामपंचायत कर्मचारी यांनी बुरुडगाव रोड येथील भाकपच्या कार्यालयापासून मोर्चा घेऊन येत जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात जोरदार घोषणाबाजी केली.
ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या प्रलंबीत मागण्या पुर्ण होत नसल्याने सर्व कर्मचार्यांमध्ये असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने संपुर्ण जिल्ह्यात निषेध दिवस पाळण्यात आला.
प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती समोर निषेध दिनानिमित्त निदर्शने करुन ग्रामपंचायत कर्मचारी यांनी निवेदन दिले. या आंदोलनात संघटनेचे जनरल सेक्रेटरी अॅड.कॉ. सुधीर टोकेकर, एकनाथ सकट,
राहुल चव्हाण, सतीश पवार, शब्बीर शेख, उत्तम कटारे, बाळासाहेब लोखंडे, कृष्णा थोरात, सुरेश पानसरे, बजरंग मुरमुडे, धोंडीभाऊ सातपुते, सचिन कुलट, रंगनाथ चांदणे, भाऊ जगधने आदी ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम