उपमुख्यमंत्री अजित पवारांचे खडेबोल म्हणाले व्हीडिओ महाराष्ट्रात…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील कोरोना स्थिती आणि त्यावरील कडक निर्बंधांवर बोलताना माध्यमांचेही कान टोचले.

लोक म्हणतात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये निवडणुका आहेत. तिकडेही गर्दी होते, मग महाराष्ट्रात निवडणुका का नको.

त्यामुळे टीव्ही चॅनलवाल्यांनी देशातील इतर ठिकाणचे गर्दीचे व्हीडिओ महाराष्ट्रात दाखवत बसू नये, असे आवाहन पवार यांनी केले.

तिथे निवडणूक असल्याने हे घडणार परंतु ती निवडणूक संपल्या संपल्या तिथे नियमावली कडक केली जाईल.पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला कोरोना निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.

कारण ही भारत सरकारने लावलेली निवडणूक आहे. रविवारी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 31 मार्चला मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

जिथे निवडणूक आहे तिथे सर्वच राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि उमेदवार या सर्वांनी मिळून कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe