उपमहापौरपद ! आमदार जगताप यांच्याकडे पाठवण्यात आली ही दोन नाव

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- मनपाच्या महापौर निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची नुकतीच बैठक पार पडली.

या बैठकीत उपमहापौर पदासाठी विनीत पाऊलबुद्धे आणि गणेश भोसले यांच्या नावाची शिफारस आ. संग्राम जगताप यांच्याकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

30 जून रोजी विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. महापौर पद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे.

गत आठवड्यात मुंबईमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय झाला. दरम्यान याच अनुषंगाने राष्ट्रवादीच्या 19 नगरसेवकांची नुकतीच बैठक झाली.

या बैठकीत उपमहापौर पदावर चर्चा झाली. पाऊलबुद्धे आणि गणेश भोसले यांनी त्यासाठी इच्छा व्यक्त केली. दोघांची नावे आ. जगताप यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत.

महापौर शिवसेनेचा आणि उपमहापौर राष्ट्रवादी असा निर्णय झाल्याचे नगरसेवकांना कळविण्यात आले.

तसेच बैठकी दरम्यान शिवसेना-राष्ट्रवादी एकीचा झालेल्या निर्णयाची माहिती गटनेते संपत बारस्कर यांनी नगरसेवकांना दिली.

मुंबईचा निर्णय म्हटल्यानंतर मान्य करावेच लागेल, असे सांगत आगामी काळात विकास कामासाठी निधी वाटपात दुजाभाव नको, अशी मागणी यावेळी पुढे आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe