कोरोना काळात कर्तव्यात कसुर; दोन शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोना काळात कर्तव्यात कसुर करणाऱ्या दोन शिक्षकावर कार्यवाही करण्यात आली आहे. तहसील विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

तालुक्यातील ही पहिलीच कारवाई आहे. अहमदनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून प्रशासनाकडून दिवसेंदिवस विविध उपाययोजना केल्या जात आहेत. प्रशासनाकडून प्राथमिक शिक्षकांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत.

गावातील विलगीकरण कक्षात रुग्णांच्या नोंदी ठेवणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, कोवीड के सेंटर व लसीकरण केंद्र इ. ठिकाणी शिक्षकांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत. प्राथमिक शिक्षकांकडून कोरोनाच्या आपत्ती काळात मोलाचे योगदान मिळत आहे.

आरोग्य, महसुल, पोलीस यंत्रणा सोबत ग्रामस्तरावर तलाठी, ग्रामसेवक यांच्यासोबत प्राथमिक शिक्षक मोलाची भुमिका बजावत आहेत. परंतु ग्रामस्तरावर काही लोक कोरोना काळात नेमणूक दिलेल्या कर्तव्याकडे जाणूनबुजून पाठ फिरवत आहेत.

कर्तव्यात कसूर व हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचा-यांवर कडक कारवाई तालुका प्रशासनाकडून केली जांत आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या राजेंद्र ढगे सहा. शिक्षक जि. प. प्राथ. शाळा, आठवड व शरद म्हस्के , सहा. शिक्षक, जि. प. प्राथमिक शाळा, मांडवे तसेच यांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागितला आहे.

कोरोना आपत्तीच्या काळात व शासकिय कर्मचा-यांनी त्यांना नेमून दिलेले कर्तव्य पार पाडावे. यापुढे कर्तव्यात कसूर करणा-या कर्मचा-यांची गय केली जाणार नाही.

तसेच सर्व कर्मचा-यांनी एकजुटीने प्रयत्न करून आपला तालुका लवकरात लवकर कोरोना मुक्त करावा. असे आवाहन तहसिलदार उमेश पाटील यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe