देसी गर्लचा विदेसी तडका…न्यूयॉर्कमध्ये सुुरू केलं भारतीय रेस्टॉरंट

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने न्यूयॉर्कमध्ये तिच्या मालकीचं एक इंडियन रेस्टॉरंट सुरु केलं आहे. प्रियंकाने इंस्टाग्रामवर फक्त पोस्टच शेअर केली नाही तर रेस्टॉरंटचे फोटोही शेअर केले आहेत.

फोटोंमध्ये रेस्टॉरंटच्या शुभारंभासाठी प्रियंका पूजा करताना दिसतेय. यावेळी निक जोनससुद्धा तिच्यासोबत दिसतोय. फोटो शेअर करत प्रियंकाने लिहिलं आहे की, “मी तुम्हाला माझ्या नव्या रेस्टॉरंटबाबत सांगताना खूप खूश आहे. हे एक असं रेस्टॉरंट आहे जिथे तुम्हाला भारतीय व्यंजनं चाखता येतील.

मी खास मेन्यू माझ्या रेस्टॉरंटसाठी तयार केला आहे. “माझं रेस्टॉरंट या महिन्याच्या अखेरीस सुरु होणार आहे. तुम्हा सर्वांच प्रेम आणि पाठिंब्यामुळे आज मी हे करु शकले.” प्रियंका चोप्रा यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, ‘सोना हे असं प्रतिक आहे, ज्यासोबत मी मोठी झाली आहे.

या रेस्टॉरंटचे स्वयंपाकघर अत्यंत प्रतिभावान शेफ हरी नायक चालवणार आहेत. त्यांनी अतिशय चवदार आणि नाविन्यपूर्ण मेनू तयार केला आहे. जो तुम्हाला माझ्या देशाच्या अन्नाची चव देईल. सोना या महिन्यात सुरू होत आहे. यासाठी माझे मित्र मनीष गोयल आणि डेव्हिड रॉबिन प्रयत्न करत आहेत.

न्यूयॉर्कमध्ये अस्सल भारतीय हॉटेल :- महत्वाचं म्हणजे प्रियंकानं सुरू केलेल्या या रेस्टॉरंटमध्ये अस्सल भारतीय जेवण मिळणार आहे. त्यामुळे आता न्यूयॉर्कमधील लोकांनासुद्धा भारतीय जेवण चाखता येणार आहे.

त्यामुळे ही अभिमानास्पद बाब आहे. दरम्यान, ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून ‘अनफिनिश्ड’ या आत्मचरित्रामुळे चर्चित आहे. या पुस्तकात प्रियंकाने व्यक्तिगत आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe