वीजवाहक तारांचे शॉर्टसर्किट होऊन दोन एकर ऊस खाक!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील भानुदास केदार व विष्णू केदार यांच्या शेतामधील विजेच्या तारा एकमेकांना घासल्यामुळे विजेचे लोळ पडून दोन एकर ऊस पिक जळून खाक झाले.

ही घटना बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये उसाचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. कोरडगाव (ता. पाथर्डी) येथील सेवानिवत्त मेजर भानुदास केदार तसेच त्यांचा भाऊ विष्णू केदार यांच्या राहत्या घराजवळ  वीज वितरण कंपनीची मुख्य लाईन गेली आहे.

सदर ठिकाणाहुन परिसरातील अनेक डीपींना वीज पुरवठा पाठविण्याची सुविधा आहे. अनेक दिवसापासून या ठिकाणी तारा एकत्र येत होत्या.

त्याबाबत ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीला सूचना दिल्या होत्या. परंतु कंपनीने याकडे दुर्लक्ष केले. बुधवारी दुपारी सदरच्या तारा एकमेकांना चिकटून विजेचे लोळ या ठिकाणच्या उसामध्ये पडल्याने सदरच्या उसाने पेट घेतला होता.

यात सुमारे ५ लाखाचे नुकसान झाले आहे. कुठलीही जिवीतहानी झाली नाही. वीज वितरण कंपनीच्या असिस्टंट इंजिनिअर प्रिया मुंढे यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News