अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- दुचाकीसह, चारचाकी, घरात फ्रीज, टेलीफोन (लॅण्ड लाईन) यासह विविध प्रकारच्या १३ अटीमध्ये बसणार्या सुमारे ६६ हजार जणांचे अर्ज प्रधानमंत्री आवास योजनेतून अर्ज बाद केले आहेत.
या सधन कुटूंबाचे प्रस्ताव हे ऑनलाईन पध्दतीने आधार लिंकमुळे फेटाळण्यात आल्याने यांचे सरकारी घराचे स्वप्न भंग पावले आहे. मागील दोन वर्षापासून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे प्रधानमंत्री आवास योजनेतून ऑनलाईन अर्ज येत असून, या आलेल्या सर्व अर्जाची जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून पडताळणी करण्यात येत आहे.
यात बंगला आणि दुचाकी चार चाकीगाडी,५० हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमेचे किसान क्रेडीट कार्ड असणारे, घरात फ्रीज , टेलीफोन (लॅण्ड लाईन) , कुटूंबातील व्यक्ती शासकीय नोकरीत असल्यास, जमीन एनए असणारे, कुटूंबातील व्यक्तीचे १० हजार पेक्षा मासिक उत्पन्न असल्यास,
अडीच एकर अथवा त्यापेक्षा अधिक बागायत जमीन असणारे, पाच एकर पेक्षा अधिक जिरायत जमीन असणारे, साडेसात एकर अथवा त्यापेक्षा अधिक जमीन एक मोटारीवर ओलीताखाली आणणारे कुटूंब यांची माहिती आधार लिंक असून या कुटूंबांनी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुलासाठी ऑनलाईन अर्ज केेले होते.
मात्र, आधारमुळे या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती समोर आली असून त्यांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गेल्या दोन वर्षांत जवळपास ३ लाख जणांनीऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे. तब्बल ६६ हजार जणांचे अर्ज पात्र ठरले आहेत. तर पात्र ठरलेल्या अनेक लाभार्थ्यांची कामेही पूर्ण झाली आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम