दर्जेदार विकास कामे हाच अजेंडा डोळ्यासमोर ठेवून विकास : आमदार जगताप

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :-  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बहुतांश रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत दर्जेदार विकास कामे हाच अजेंडा डोळ्यासमोर ठेवून विकास कामे करीत आहे करीत आहोत, रामचंद्र खुंट हा परिसर बाजारपेठेचा व रहदारीचा असल्यामुळे या रस्त्याचे काम होणे गरजेचे होते.

आता ते पूर्ण झाले आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. प्रभाग क्रमांक दहाच्या नगरसेविका अश्विनी सचिन जाधव यांच्या प्रयत्नातून कोठला स्टँड ते रामचंद्र खुंट चौकापर्यंतच्या रस्ता डांबरीकरण कामाची पाहणी आ. संग्राम जगताप यांनी केली

यावेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले,मा.नगरसेवक सचिन जाधव,आनंद नांदूरकर,राजेंद्र कटारिया,विनोद मालपाणी,संजय कासट,डॉ.अरुण राऊत,डॉ.सईद शेख, सत्यम देवळालीकर,दीपक काशीद,कैलास काशीद उपस्थित होते.

माजी नगरसेवक सचिन जाधव म्हणाले, रामचंद्र खुंट परिसर हा रहदारीचा व बाजारपेठेचा परिसर आहे.जमिनीअंतर्गत भुयारी गटारी चे काम व पिण्याच्या पाण्याचे जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी रस्ते खोदावे लागले असल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली होती

त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता आता ही सर्व रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत, प्रभागातील टप्प्याटप्प्याने सर्व विकासकामे मार्गी लागतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News