देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळेल…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-मध्यावधी होईल की, नाही याचा निर्णय सरकारला करायचा आहे. मात्र ते तशी हिम्मत करणार नाही.

कारण लोकांमध्ये राज्य सरकारबद्दल एवढी नाराजी आहे की, राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडी सरकार कोसळेल, अर्थात आघाडी पुन्हा सत्तेवर येणार नाही असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केला.

लोकांमध्ये महाविकास आघाडी सरकारबद्दल प्रचंड नाराजी आहे हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घेतल्या तर त्याचा फटका आपल्यालाच बसेल याची जाणीव आघाडीच्या नेत्यांना आहे.

त्यामुळे ते निवडणुका घेणार नाहीत, अशी टीका फडणवीस यांनी केली. सहकार चळवळीमध्ये चुकीची कामे केलेल्यांना आणि सहकार बुडवला त्यांनाच या नव्या खात्यासंदर्भात भीती आहे. अमित शहा यांंच्या राजकारणाची सुरुवातच सहकारातून झाली आहे, असे ते म्हणाले.

तर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर समता परिषदेचे उपाध्यक्ष हरी नरके यांच्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यांचे बॉस छगन भुजबळ यांच्यासोबत या विषयावर अॅकॅडमिक मुद्द्यांवर चर्चा करायला मी तयार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!